{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

अवघड दुष्काळ असल्याने शासनाने तातडीने निर्णय करावेत

थोरात कारखान्याचा 60 वा गळीत हंगाम शुभारंभ

संगमनेर । झुंझार न्यूज

 

यावर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कारखान्याची संख्या वाढली असून प्रत्येक कारखान्याने आपली क्षमता वाढविली आहे. ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणारी साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, चारा हे सर्व प्रश्न असून अशा गंभीर दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने निर्णय करून साखर कारखानदारीसह शेतकरी, शेतमजूर महिला व सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड.माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, बाबा ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, शरद नाना थोरात, रामहरी कातोरे,हौशीराम सोनवणे,  संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे,रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव,अंकुश ताजणे,दिलीप नागरे, बंडु नाना भाबड,सौ.लताताई गायकर,सौ.सुंदराबाई डुबे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आधी उपस्थित होते.

Oplus_131072

याप्रसंगी बोलताना मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यामध्ये कारखान्यांची संख्या वाढली आहे. कमी दिवसांमध्ये जास्त गाळप करण्याकरता कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. कारखान्यांमध्ये उसाची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. कारखानदारी अडचणीत आली आहे.

Oplus_131072

थोरात कारखान्याने कायम सभासद ,शेतकरी ,ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्रात व बाहेरील सर्व शेतकरी, ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास संपादन केला असून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. थोरात कारखान्याचे 9000 मे.टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अवघड परिस्थिती ही यावर्षी 11 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.

Oplus_131072

यावर्षीचा दुष्काळ हा अत्यंत अवघड आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला असून रब्बी होण्याची शक्यता नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतमजुरांना काम नाही.शेतकऱ्यांसाठी पशुधन हे लक्ष्मी आहे त्यांची हाल पाहवत नाही. सरकारने आता पंचनामामध्ये टाइमपास न करता तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा दिला पाहिजे. रोजगार हमीची कामे, चारा छावण्या याबाबत निर्णय झाले पाहिजे. सरकार मात्र पैशाचा आव आहे आणि जनता उपाशी ठेवत आहे. साधे संजय गांधी योजनेबतीत निराधार लोकांचे पैसे मिळाले नाहीत अशी वाईट अवस्था आहे.

यावर्षीचा दुष्काळ हा कोरोनाप्रमाणे संकट असून काटकसर, मेहनत, यामधून मार्ग काढत सर्वांची दिवाळी आनंदात करणार आहोत. कार्यक्षेत्रामध्ये हक्काचा ऊस वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. कारखान्याकडून ऊस उत्पादकांना यावर्षीही चांगला भाव मिळणार असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. अशा दुष्काळाच्या संकट काळात सरकारने कारखानदारी सह शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत करावी अशी अपेक्षा या निमित्ताने राज्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकात कारखान्याने सभासद, शेतकरी व कार्यक्षेत्रा बाहेरी ऊस उत्पादकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. ऑफ सीजन काळात कारखान्याची सर्व कामे वेळेत पूर्ण केली आहेत. याचबरोबर विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी सभासद, ऊस उत्पादक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद ,ऊस उत्पादक, शेतकरी व कामगार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला असून दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त यावर्षीही कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे अनुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा मा. कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *