यंदाचा दुष्काळ भयानक, सामुहिक प्रयत्नांची शिकस्त करून येणा-या प्रत्येक संकटावर मात करू : आमदार विवेकभैय्या कोल्हे

कोपरगांव । झुंझार न्यूज 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदृष्टीच्या विचारातुन ६४ वर्षात अनेक संघर्षाला तोंड देवुन दुष्काळात शेतकरी व पशुधन जगविले, तुटीच्या गोदावरी खो-यात पाणी वाढविण्यांसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले, यंदाचा दुष्काळ मोठा आहे शेतकरी व त्यावर अवलंबुन असणारी साखर कारखानदारी जगविण्यासाठी सर्वांनाच सामुहिक प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, त्यातच जागतिक परिस्थितीत होणारी भाववाढ आणि उद्योगांवर होणारे प्रहार हे समिकरण अडचणीचे होते अशाही परिस्थितीत इतरांच्या तुलनेत उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मागे राहणार नाही अशी ग्वाही आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी दिली. दहा गुंठ्यात २५ ते ३० टन उसाचे उत्पादन कसे आणता येईल यावर सर्वच सभासद शेतक-यांनी प्रयत्न करावे त्यासाठी थेट बांधावर जात उपाययोजना करू असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा दादा कोल्हे होते.

         

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमदार विवेकभैय्या कोल्हे, संचालक बाळासाहेब वक्ते, सौ. सरलाताई वक्ते यांच्यासह सर्व आजी माजी संचालकांच्या हस्ते सोमवारी गव्हाणीत उसाची मोळी टाकुन करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

       

प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी प्रास्तविक केले. 

       

आमदार विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणांले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, श्रीमती सुनेत्राताई पवार व सर्व मंत्री महोदय दुष्काळामुळे निर्माण होणा-या प्रश्नांतुन मार्ग काढण्यांसाठी जाणिवपुर्वक काम करत आहे. युध्दजन्य स्थितीमुळे साखर उद्योगास लागणारे सल्फर १८ हजाराहुन सव्वा लाख रूपये टनांवर गेले आहे, अन्य कच्चा मालाचे दर गगनाला भिडले आहे, उसाची एफआरपी वाढली त्या प्रमाणांत केंद्र व राज्य शासनाने साखर विक्रीचे दर, इथेनॉल- सहवीज निर्माती खरेदी दरात वाढ करून साखर कारखानदारीस तात्काळ मदत करावी, इथेनॉल निर्मीतीचे धोरण ठरवावे तरच हा सहकार जगेल अन्यथा त्यावर अवलंबुन असणारी व्यवस्था कोलमडुन पडली तर पुढचे सगळेच अवघड होवुन बसेल. दुष्काळात दुरवरून उस आणणे परवडणारे नाही तेंव्हा शेतक-यांनी कमी क्षेत्रात, कमी पाण्यांत ठिबकचा सर्वाधिक वापर करून अधिकचे उस उत्पादन घेवुन साखर उद्योगासह आपल्याकडील पशुधन जगवावे, बायोचार बांबु पासुन शेतक-यांना आधार निर्माण करण्यासाठी जनजागृती करू, आधुनिकतेत संजीवनी कधीही मागे नाही. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतक-यांच्या हातुन यंदाचा खरीप हंगाम वाया गेला, रब्बी हंगामाचे काय होईल हा प्रश्न आहे अशाही परिस्थितीत महायुती शासनाकडुन गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी जगविण्यांसाठी जाणिवपुर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, त्या त्या क्षेत्रात तज्ञ असणा-या कार्यकर्त्यांची समिती करून येणा-या प्रत्येक संकटावर मात करण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन शेतक-यांच्या पाणीपटटीवर आकारला जाणारा सेस कमी करण्यासाठी प्रयत्न करू, साईबाबा कॉर्नर ते संजीवनी सीमेंट काँक्रीट रस्त्यासाठी २० कोटीचा निधी आणुन काम सुरू केले आहे तर शहरातही विविध विकास कामांसाठी २० कोटींचा निधी मंजुर करून आणला आहे, १५० विंधन विहीरीची (बोअरवेल) दुरूस्ती सुरू केली आहे. ग्रामिण भागातील प्रश्न व प्रत्येक रहिवासीयांच्या समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्यादृष्टीने पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व व्यवस्थापनाची बैठक घेवुन त्यातुन विकासासाठी पुढे जाण्यांचे मार्गांकमण सुरू ठेवले आहे.

       

याप्रसंगी संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, कामगार नेते मनोहर शिंदे, विजय आढाव, संचालक सर्वश्री. बापूसाहेब बारहाते, अरूणराव येवले, संजय होन, शिवाजीराव वक्ते, शिवाजीराव कदम, केशव भवर, त्रंबकराव परजणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, मोहनराव वाबळे, सोपानराव पानगव्हाणे, बाळासाहेब शेटे, डॉ. गुलाबराव वरकड, कैलास माळी, अंबादास देवकर, मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र पानगव्हाणे, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, उषाताई संजयराव औताडे, सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, उत्तमराव चरमळ, संतोष दवंगे, अशोकराव आहेर, भिमराव भुसे, विष्णुपंत क्षीरसागर, विजय रोहोम, राजेंद्र सांगळे, संभाजी आहेर, आनंदराव जावळे, राजेंद्र सोनवणे, वैभव गिरमे, दिपक चौधरी, रामदास शिंदे, विनोद राक्षे, बबलु वाणी, प्रदिप नवले, फकिरराव बोरनारे, रावसाहेब जाधव, वसंतराव देशमुख, डी. पी. मोरे, विलासराव आव्हाड, दिपक गायकवाड, संभाजीराव रक्ताटे, साहेबराव रोहोम, दगुराव चौधरी, मोहनराव लकडे पहिलवान, वाल्मीकराव भिंगारे, यादवराव संवत्सरकर, विशाल गोर्डे, कैलास राहणे, जयराम गडाख, कैलास संवत्सरकर, संभाजीराव गावंड, नानासाहेब गव्हाणे, अंबादास पाटोळे, दिलीप बनकर, बापूतात्या परजणे, नितीन तिडके, भास्कर गाडे, मच्छिंद्र वक्ते, काशिनाथ वहाडणे, सुरेश जाधव, विजय जामदार, प्रकाश गोर्डे, जनार्दन रोहोम, राजेंद्र बागुल, बाबासाहेब वराडे, दत्तात्रय दुपके, प्रदिप चव्हाण, संजय जामदार, सुनिल कदम, भिमराज वक्ते, भास्करराव सुरळे, संतोष करडे, प्रभाकर भाकरे, तांत्रीक सल्लागार सिमांचल पांडा, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, उस उत्पादक सभासद, कामगार, ऊस वाहतूक दार ट्रॅक्टर जुगाड धारक, मुकादम, ऊस तोडणी कामगार, शेतकी खात्याचे सर्व कर्मचारी,आदि उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले

           

तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी वालदेवी, आळंदी, वाघाड, पालखेड, काश्यपी, गौतमी, मुकणे, भाम, भावली, वाकी, मुकणे उंचीवाढ, निळवंडे आदि धरणांची कामे मार्गी लावुन पश्चिमेचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्यांसाठी जे प्रयत्न केले त्यामुळेच येथील शेतकरी संकटातही तग धरून आहे असे बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *