अमृतवाहिनीतील कबीरवाणीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर । झुंझार न्यूज

 

सध्या देशामध्ये धार्मिक आणि जातीपातीचे राजकारण सुरू आहे. जे तरुण पिढीला अजिबात मान्य नाही. या तरुणांना प्रगतशील व विज्ञानाचा देश हवा आहे. संतांचा समाज सुधारकांचा मानवतेचा मंत्र हवा आहे. मात्र काही राजकीय लोक तरुण पिढीला धर्माच्या नावावर पुन्हा मागे नेण्याचा प्रयत्न करत असून  झेन झी ही संत कबीरांच्या मानवतेच्या विचारांची असल्याचे प्रतिपादन मा. महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून अमृतवाहिनीत झालेल्या कबीर वाणीला तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून कबीर कॅफे हा कबीर वाणीचा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, रामहरी कातोरे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, व्यवस्थापक प्रा. व्ही बी धुमाळ, प्राचार्य डॉ. प्रसाद बाविस्कर, डॉ बी एम लोंढे, प्रा. जी.बी काळे, डॉ मच्छिंद्र चव्हाण, प्रा विजय वाघे ,नामदेव गायकवाड ,विलास भाटे यांच्यासह सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते.

या संत कबीरवाणी संगीतमय कार्यक्रमात हभप विनोद राऊत, निलेश गायकवाड, प्रा. नानासाहेब गुंजाळ, कबीर भजन गायिका शरयू झंवर, जानवी झंवर, ईशा लिमये ,रिया पितळे, प्रथमेश बिडवे ,प्रताप राऊत, अवधूत काळे ,विशाल पाटील यांनी सहभाग घेऊन सुंदर कबीर वाणी सादर केली.

यामध्ये सुरुवातीला विनोद राऊत यांनी कबीर कहे कमाल को, दो बाणा सिख लो,कर साहिब की बंदगी भुके को अन्न दे हे गीत सादर केले तर आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन यामध्ये सर्व मंत्रमुग्ध झाले.

जानवी च्या आवाजातील कहे गये कबीर धीरे धीरे मना रे या गीताने प्रत्येकाला ठेका धरायला लावला. तर जरा धीरे धीरे गाडी हा को मेरे राम गाडीवाले या गीताला टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

जब हम पैदा हुए, हम रोये ,जग हसे,

ऐसी करनी कर चले, हम हसे ,जग रोये या गीताने प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकविला.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संत कबीरांचा विचार हा मानवतेचा आणि प्रेमाचा विचार आहे. माणसांवर आणि गरिबांवर प्रेम करा, पशुपक्ष्यांवर दया करा, भेदभाव करू नका हा संदेश त्यांनी दिला आहे. मानवधर्म हा विचार श्रेष्ठ असून तो कायम श्रेष्ठ राहणार आहे.

कबीर कॅफे या मधून मानवतेचा विचार पुढे नेण्यासाठी चांगले काम होत आहे. सध्याच्या तरुण पिढीला प्रगतशील आणि विज्ञानवादी देश हवा आहे. मात्र राजकारणी लोक जातीपातीचे राजकारण करत आहेत भेदभाव करत आहेत. हे या झेनजीला मान्य नाही. त्यांना देशाला विज्ञानातून पुढे नेणारे विचार हवे आहेत. धार्मिकतेच्या नावावर मागे अनेक नेणारे नको.संत कबीरांचा मानवतेचा विचार हवा असून तो सर्वांनी पुढे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संत कबीर यांनी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी सांगितलेला मानवतेचा आणि समतेचा विचार हा आजच्या काळात सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हा विचार कायम जोपासला असून माणुसकी आणि मानवता धर्म वाढवण्यासाठी कबीर वाणी हा उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे ते म्हणाल्या.

यावेळी सर्व कबीर वाणी गायन करणाऱ्या कलावंतांचा सत्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व गीतांना तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *