कोपरगाव शहरी भागातील आशा कर्मचारी यांनी दिनांक 12 आक्टोबर सव्वीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दिपावली साठी सानुग्रह अनुदानाची मागणी केली नासिक महानगर पालीकेने आशा कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान बाविस हजार रुपये मंजुर केले आहे दिपावली सनासाठी सदर अनुदान नासीक महानगर पालिका आशांना देणार आहे त्याच धरतीवर कोपरगाव नगर पालीकेने आशा कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन कोपरगाव तालुका आशा कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केले आहे.
नाशिक प्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात आशा आरोग्य सेवेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे त्यांना मानधन देखील तुटपुंजे आहे ते देखील वेळेवर होत नाही त्यामुळे दिपावलीचा सन जवळ आला आहे या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना नगर पालीकेने काहीतरी दिपावली भेट द्यावी अशी अहिल्यानगर आशा कर्मचारी संघटनेची मागनी आहे नासीक महानगर पालीकेच्या धरतीवर संपुर्ण महाराष्ट्रात महानगर पालीका नगर पालीका ग्रामपंचायत स्तरावर आशांना दिपावली भेट ह्यावी अशी आशा कर्मचारी संघटनेची मागनी आहे .
सदर निवेदनावर स्वाती आरणे उज्वला दुशिंग योगिता भोसले सोनाली राऊत विजया दुशिंग छाया सुपेकर सुनिता देवरे कविता हिवरडे सपना दाभाडे वैशाली वाघ यांच्या सह्या आहेत.
कॉ. सुरेश पानसरे कार्याध्यक्ष आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटना अ. नगर यांचे कडून.