गेवराई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस दलात प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षपणे सेवा बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे.
या पदकामुळे गेवराई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पोलीस दलाची मान उंचावली आहे.
अनिल कटके यांनी संगमनेर तालुक्यातील आशी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना उत्कृष्ट प्रकारे आपली कामगिरी पार पडली होती त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदक गुणवत्ता सेवेचा सन्मान मिळाल्याबद्दल आश्वी पोलीस स्टेशन परिसरातील गावांमधून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे