स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
झरेकाठी । झुंझार न्यूज
अहिल्यानगर येथील बुऱ्हाणनगरमध्ये स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रीकृष्ण भक्तीचा दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या व प्रवचनकार जया किशोरी जी यांच्या सुमधूर वाणीतून श्रीकृष्ण कथा सादर केली जाणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना श्रीकृष्ण भक्तीचा आनंद अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
जया किशोरी जी यांच्या ओघवत्या वाणीतून श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, भक्तीचे महत्त्व, भगवद्गीतेतील संदेश आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारे आध्यात्मिक विचार यांचे निरूपण केले जाणार आहे. त्यांच्या प्रवचनातून श्रद्धा, प्रेम, करुणा आणि सदाचार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचणार आहे.
दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या वेळेत श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुऱ्हाणनगर येथील स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निवासस्थानी हा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांनी सर्व भाविकांना दिले आहे. तसेच या श्रीकृष्ण कथेचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ : स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे निवासस्थान, बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर.