{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

बाजारपेठेत प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन सदिच्छा भेटी; देत साधला संवाद

 

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना आमदार अमोल खताळ यांनी बाजारपेठेत पायी फिरून व्यापारी, नागरिक, महिला आणि लहान मुलांशी आपुलकीने संवाद साधला. प्रत्येकाची भेट घेत हस्तांदोलन केले, त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली आणि सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आमदार खताळ यांच्या या थेट जनसंपर्कामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

दिवाळीच्या सणानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी कोणताही औपचारिकतेचा बडेजाव न करता थेट व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाची तसेच सध्याच्या व्यापारातील परिस्थितीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सणासुदीच्या काळात व्यवसाय कसा सुरू आहे, ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे, याचीही त्यांनी माहिती घेतली.

यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी, महिलांशी तसेच चिमुकल्यांशीही त्यांनी संवाद साधला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांशी थांबून हस्तांदोलन केले. लहान मुलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार खताळ यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून साधलेल्या या संवादाचे बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

आमदार खताळ यांच्या या दिवाळी सदिच्छा भेटीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून झाली. त्यानंतर अशोक चौक, मेन रोड, कुंभार गल्ली बाजारपेठ आणि नेहरू चौक बाजारपेठ या शहरातील प्रमुख भागांतून त्यांनी पायी फिरत व्यापारी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक दुकानात जाऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच नागरिकांशी हस्तांदोलन करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीची सांगता स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात झाली. आमदार खताळ यांनी दिवाळीच्या निमित्ताने थेट बाजारपेठेत जाऊन व्यापारी आणि नागरिकांशी साधलेल्या या संवादामुळे त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी अशा सर्वच घटकांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक हातभार लावणे ही काळाची गरज आहे. म्हणून दिवाळीनिमित्त सर्वच ग्राहकांनी आपल्या परिसरातील हिंदुत्ववादी विचारसरणी जपणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वस्तूंची खरेदी करावी.

श्री अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *