गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार
आश्वी । झुंझार न्यूज
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक, गरीब कुटुंबे, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक भावनेतून शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांमध्ये दिवाळीचा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नुकतेच खळी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर भाऊ वाघमारे यांच्या उपस्थितीत दिवाळीच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांमध्ये हा उपक्रम विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख खासदार ज्योती वाघमारे, आमदार विठ्ठलराव लंगे, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख समन्वयक तथा मुख्य सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार राम पांडागळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर खोते, जिल्हा संघटक विजयराव काळे तसेच कॉर्डिनेटर मुकुंदसिंह नगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम सुरू आहे.
खळी येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिधावाटप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर तसेच महिलांना दिवाळीचा आनंदाचा शिधा देण्यात आला. सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या माध्यमातून काहीसा दिलासा मिळणार असून, त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव बाळासाहेब पाळंदे, राहाता तालुकाप्रमुख जॉन पाळंदे, खळी गावचे विद्यमान सरपंच विलास वाघमारे, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपप्रमुख मच्छिंद्र जगताप, सुधीर गाडेकर, शिवसैनिक दत्तात्रय पर्वत, सुरेश जोरी, महिला आघाडी प्रमुख माया वाघमारे, सचिव उज्वलाताई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक अनिल वाघमारे, सर नामदेव लबडे, बाळासाहेब भिकाजी वाघमारे, छबुदात्रक, लक्ष्मण बेर्डे, निलेश वाघमारे, सोमनाथ मांढरे, गोरख नागरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांच्या सणात आनंदाची भर घालणारा हा उपक्रम शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांमध्ये राबविला जात असल्याने शिवसेनेच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.