आश्वी : झुंजार न्यूज                                         संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कृष्णा भूषण उदयोग समुहाच्या वतीने आज सोमवार दि .२७ मार्च २०२३ रोजी महीला सन्मान मेळावा व पशूपालक प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उदयोग समुहाचे अध्यक्ष मोहित गायकवाड यांनी दिली

 सोमवार दि २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता आश्वी खुर्द येथील हनुमान मंदिर प्रांगणात संगमनेर शहर पोलिस उपनिरिक्षक निकिता महाले यांच्या अध्यक्षखाली व नाशिक येथील आत्मा विभागातील प्रकल्प उपसंचालिका सौ वंदना शिंदे यांच्या हस्ते आदर्श गुणवंत महिलांचा सन्मान होणार असून या कार्यक्रमास निर्मल उदयोग संचालिका सौ मिना पवार , जनपरिषदेचे समाजवादी अॅड निशाताई शिवूरकर , कृषी सहाय्यक सौ प्रांजल कवडे – जाधव , श्रद्धा डेअरी फॉर्मचे संचालिका सौ श्रद्धा ढवण -ढोरमळे , गेन्स अॅकॅडमी फाऊंडेशनचे नोडल ऑफिसर संतोष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे तर .. .
सायंकाळी ६ : ३०  वाजता पशुपालकाकरिता शेतीपूरक दूध व्यवसायात यशस्वी होण्याकरिता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नवनाथ दूध संकलन केंद्राचे चेअरमन केशवराव शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली  करण्यात आले असून अशोक खरात , अमोल शिंदे , नितिन फलके , डॉ निलेश खांडे , डॉ निलेश लगड , डॉ गोकूळ भांड , श्रद्धा डेअरी संचालिका सौ श्रद्धा ढवण – ढोरमळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
तरी आश्वी व परिसरातील पशूपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मोहित गायकवाड यांनी केले आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *