गुरुजनांनी दिले विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन
संगमनेर : झुंजार न्यूज
तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मिष्टांन भोजन देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर विद्यार्थ्यांनी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा असलेला फोटो शाळेला भेट दिला यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या शाळेच्या दिवसापासून ते आजपर्यंत च्या आठवणी सांगितल्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय चंद्रभान शिंदे,उपाध्यक्ष सीताराम नाना शिंदे,मुख्याध्यापक श्री.जगधने, श्रीमती पाटोळे, श्रीमती काळे आदींसह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडन वाहत होता तर विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा असलेला फोटो शाळेला भेट दिला.
