कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पुढाकार

संगमनेर : झुंजार न्यूज 

सह्याद्री विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व खांडगाव येथील रहिवासी श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीची पोलंड येथील युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून तिच्या पोलांड अभ्यास दौऱ्यासाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनने विमान प्रवासाची मदत केली आहे.

श्रद्धा गुंजाळ ही ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच अवकाशातील संशोधनाविषयी तिला मोठे आकर्षण होते. यातूनच एरोस्पेस इंजिनिअरिंग एरोनॉटिकल  या शिक्षणासाठी एमआयटी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश घेतला. तिच्या सततच्या धडपडीतून तिची नासाच्या इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम साठी कॅनडी स्पेस सेंटर येथे निवड झाली आहे .यात जगातील 60 जणांपैकी श्रद्धा गुंजाळ ही एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे .

या निवडीनंतर श्रद्धा गुंजाळ हिने काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन घेतले असून इंटरनॅशनल एअर स्पेस संशोधन कार्यप्रणाली बाबत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, श्रद्धा गुंजाळ ही ग्रामीण भागातील विद्यार्थी असून तिची नासाच्या स्पेस सेंटर मध्ये होणारी निवड ही संगमनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. आपल्या तालुक्याची सुकन्या एरोस्पेस मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्रद्धाला मदत म्हणून महिला सबलीकरणासाठी काम करणा-या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून पोलंड दौऱ्यासाठीचा  विमान प्रवासाचा खर्च केला जाणार आहे.

तर श्रद्धा गुंजाळ म्हणाली की, मी सह्याद्री विद्यालयात शिकत होते तेव्हापासूनच मला अंतराळाचे मोठ्या आकर्षण होते. माझी झालेली निवड ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी असून मला सातत्याने काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

श्रद्धा गुंजाळ यांच्या या निवडीबद्दल तिचे मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,सौ दुर्गाताई तांबे ,इंद्रजीत भाऊ थोरात ,रणजितसिंह देशमुख, रमेश गुंजाळ आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed