संगमनेर : झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास फारुक हुसेनभाई सय्यद हे आपल्या शेतातून पिकाला पाणी भरुन घराच्या दिशेला आपल्या टू व्हिलर वर निघाले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला मात्र या हल्ल्यात बिबट्याने मारलेला पंजा वसरता लागल्याने सय्यद यांनी गाडी जोरात चालवल्याने थोडक्यात बचावले. आदल्या दिवशीय कुकरुवर हल्ला चढवून पळवून नेल्याने आता बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले .

‘ देव तारी त्याला कोणी मारी ‘ या म्हणीनुसार शुक्रवारी साडे सातच्या सुमारास माळरानावरील असणार्‍या आपल्या शेतातील वांग्याच्या पिकाला पाणी देवून रोज्या समाप्ती करिता फारुक सय्यद घाई गडबडीत गावांतील घराकडे मोटार सायकल वर निघाले असता दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी हल्ला चढविला . मात्र अडवा असलेला हल्ल्यामुळे गाडी सरळ पुढे निघून गेल्याने सय्यद यांच्या पाठीवर ओझरता पंजा लागला हल्ला झाल्याची चाहूल लागल्याने सय्यद यांनी गाडी जोरात घेतल्याने बिबट्याच्या हल्ल्यात सुखरुप बचावले , मात्र बिबट्यांनी अनेक दिवसापासून पानोडी मध्ये दहशत निर्माण केली असून रोज कुठे ना कुठे हल्ला होत असून पानोडी व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री – अपरात्री शेतकऱ्यांना पिकांला पाणी शेतात शेतकर्‍यांना जावे लागते .  वनविभागाने त्वरीत बिबट्यांचा बदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed