संगमनेर : झुंजार न्यूज 

सातत्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विविध उपक्रम राबवणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील अनेक विद्यार्थी संशोधन पर शिक्षणावर भर देत असून यामुळे मागील पाच वर्षापासून पॉलिटेक्निक मधील अनेक विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. राज्यस्तरावर झालेल्या स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून स्मार्ट हेल्मेट या प्रोजेक्ट करता 22 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. व्ही  बी धुमाळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्राध्यापक धुमाळ म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी पॉलिटेक्निकने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखणे आहे. उत्कृष्ट निकालाबरोबर विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी या महाविद्यालयातून मिळालेली आहे.

संशोधनावर भर देताना यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सहभाग नोंदवला यामधून आयटी विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थी ताराचंद ब्राह्मणे विनायक आरोटे मयूर मगर व मोरेश्वर नाईकवाडी यांनी बनवलेल्या स्मार्ट हेल्मेट या प्रोजेक्टसाठी एमआयटी पॉलिटेक्निक मध्ये झालेल्या कॉम्पिटिशन मधून 22 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. तर याच प्रोजेक्टला बेल्हे पॉलीटेक्निक मधून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. वाढते अपघात यावर दुचाकी स्वारांना हेल्मेट हा सर्वोत्तम पर्याय असून या हेल्मेट मधून मोबाईलची व्यवस्था , सेन्सरच्या साह्याने होणारे अलर्ट यांसह विविध आधुनिक सुविधा देण्यात आले आहे.

प्रवरानगर इंजिनिअरिंग कॉलेज येथे झालेल्या डीफोरेस्टेशन डिटेक्शन या प्रोजेक्टला द्वितीय पारितोषिक मिळाले असून यामध्ये .नीरज तपासे आशुतोष आणि रोहित गलांडे, सफल मेहता यांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये आर्या देशपांडे व ऋचा भालेराव या विद्यार्थिनींची प्रथम पारितोषकासाठी निवड झाली. तर ऋचा भालेराव या विद्यार्थिनीला संदीप फाऊंडेशन येथे टू के थ्री या पेपर प्रेझेंट टेन्स स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले.

तसेच दिशा राजपाल, पूर्वा बकरे हर्षदा कानवडे या विद्यार्थिनी नाही संभाजीनगर येथे झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला. तर किरण शिरसागर या विद्यार्थ्याला कमिंस फाउंडेशनची स्कॉलरशिपही जाहीर झाली आहे. या विद्यार्थ्यांना आयटी विभाग प्रमुख प्राध्यापक सौ नीलिमा चौधरी व इतर विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, बाजीराव पाटील खेमनर ,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य  प्रा. व्ही .बी धुमाळ, उप प्राचार्य प्रा जी.बी. काळे, प्रा नीलिमा चौधरी यांसह सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed