संगमनेर : झुंजार न्यूज
प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल, कवडदरा, भरविर खुर्द या CBSE मान्यता प्राप्त शाळेचा इयत्ता १० वी च्या प्रथम बॅचचा निकाल १००% टक्के लागला
असून सर्व विद्यार्थ्यानी उत्तुंग यश संपादन केले आहे. यात ओंकार देवगिरे हा शाळेत प्रथम आला तर अवधूत सारुक्ते व सृष्टी बरकले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केले आहे.

ग्रामीण भागातील एकमेव C.B.S.E. मान्यता प्राप्त शाळा असून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते मा. बाळासाहेब थोरात साहेब व सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात, तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रणजितसिंह देशमुख, व सचिव मा. सौ . शरयूताई देशमुख, सी.ई.ओ. मा. स्नेहल शेकदार यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मुख्याधापिका सौ. रजनी ताजवे तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 194
