संगमनेर : झुंजार न्यूज 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर उच्च निकालाची परंपरा असणाऱ्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधील सीबीएससी बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी पास झाले असून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य सौ जे. बी. सेट्ठी यांनी दिली आहे.

सीबीएससी बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालानंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल चा निकाल  शंभर टक्के लागला असून याबाबत माहिती देताना प्राचार्य म्हणाल्या की, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संगमनेर मध्ये दिले जात आहे. उपक्रमशीलता हे या स्कूलचे वैशिष्ट असून यामधून अनेक विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवनवीन करिअरच्या वाटा उपलब्ध होत आहेत. शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखताना यावर्षी 59 विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले असून 13 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

यावर्षी प्रेरणा सुदर्शन आहेर हिने 97% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर  वेदांत अंकुश अभंग यांनी 94.40% गुण मिळून दुसरा क्रमांक मिळवला आहे. हर्षल संतोष मरडे यांनी 93.20% गुण मिळून तिसरा क्रमांक मिळवला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,  मा. आ डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, बाजीराव पाटील खेमनर, लक्ष्मणराव कुटे,  आर.बी. सोनवणे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, विलासराव वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ, प्राचार्य सौ जे.बी.शेठी यांनी अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed