मुंबई : झुंजार न्यूज
या योजनेमुळे २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. काही शाळांनी कपड्यांची ऑर्डर दिल्यामुळे अशा शाळांमध्ये शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार, असे तीन दिवस परिधान करतील, तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, असे तीन दिवस परिधान करतील, असे केसरकर यांनी सांगितले. यासाठी वर्षाला ३८५ कोटींचा खर्च येईल. गणवेशासाठी निविदा काढल्या जातील, असेही ते म्हणाले.
…असा असेल गणवेश n आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. n शाळांमध्ये सलवार- कमीज असेल, तर सलवार गडद निळे, कमीज आकाशी रंगाचा असेल. मुलांना सामाजिक बांधीलकीची जाणीव असावी, या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. n बूट-मोजेही देण्यात येतील. सर्व शासकीय शाळांतील सर्व मुलांना गणवेश दिला जाईल. खासगी शाळांतील मुलांनाही गणवेश देण्याचा मानस असल्याचेही केसरकर म्हणाले
