राहाता : झुंजार न्यूज

उतर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहाणार असल्याची माहीती महसूल मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून,लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी आशा सोहळ्यास उपस्थित राहावे आशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती.त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार्या या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या या निळवंडे धरणासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. प्रकल्प मार्गी लागावा म्हणून राज्यात सतेवर असलेल्या त्या काळातील सरकारचे सहकार्य मिळाले शेतकर्यानी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला.पाण्याची असलेली प्रतिक्षा आता पाणी सोडण्याच्या चाचणीमुळे संपणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा क्षण महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होणार असल्याने त्याचेही नियोजन या कार्यक्रमातून सुरू करण्याचा प्रयत्न होत होणार आहे.मागील दोन दिवसांपासून अकोले राहाता संगमनेर या तालुक्यात कालव्यांची काम सुरू असलेल्या गावांना आपण भेटी देवून पाहाणी केली असून शेतकऱ्यांच्या भावनाही जाणून घेतल्या आहेत.कालव्याच्या कामातील त्रृटी दूर करण्याबाबत जलसंपदा महसूल विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होतेच,परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहावे असा आग्रह होता.त्यांनी आजच या कार्यक्रमास येण्यास होकार दिल्याने उतर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कार्यक्रमास विशेष महत्व असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.

धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन महीन्याचा कालावधी लागेल असा विश्वास व्यक्त करून उद्दिष्ट ठेवूनच ही काम पूर्ण करण्याबात विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *