कोपरगांव : झुंजार न्यूज

 कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर (रामवाडी) येथील रहिवासी व प्रा. तुकाराम लक्ष्मण डरांगे यांना संगित क्षेत्रातील योगदानाबददल श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते नुकताच निफाड दर्पण पुरस्कार प्रदान करण्यांत आला. 
 प्रा. तुकाराम डरांगे हे गेल्या २२ वर्षापासुन गायनासह संगीत क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी कलेतून हजारो कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करून विविध सामाजिक क्षेत्रात संगिताच्या माध्यमांतून मोठे योगदान दिलेले आहे. संवत्सर रामवाडी सारख्या ग्रामिण भागात राहुन त्यांनी अतिशय कष्टातुन अत्यंत लहान वयात गायनाची कला जोपासली. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम संचलित ओम गुरूदेव इंग्लिश मिडीयम, संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या डी. एड. कॉलेज येथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. १९९७ मध्ये सदगुरू गंगागिर महाराज महाविद्यालय येथे शिक्षण घेत असताना त्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता. गोदावरी माता पुरस्कारानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. गायन, साई भजन, भावगिते, बेटी बचाव बेटी पढाओ, पर्यावरण संतुलन, जल जीवन मिशन, एडस निर्मुलन जनजागृती, ग्रामस्वच्छता, साक्षरता, महिला उन्नती, प्रौढ शिक्षण, विविध शासकीय निमशासकीय योजनाची जनजागृती, शेतकरी जागृती, हुंडा निर्मुलन, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान यासह विविध क्षेत्रात त्यांनी गायनाच्या कलेतून मोठी कामगिरी केली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबददल विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारी, संघटना आदिनी प्रा. तुकाराम डरांगे यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. त्यांना गायकीच्या माध्यमातून विविध हिंदी मराठी सिनेमासाठी गाणी गायनाची संधी मिळत आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed