संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे दाढ फाटा दगडी पूल ते भांडवस्ती रस्ता खड्ड्यात गेल्यासारखा अवस्था झाली असून येथील रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून येथील रस्त्यावरची खडी व दगड हे पूर्णपणे मोकळे झाले असून रस्त्याने ट्रॅक्टर मोटार सायकल जा ये करताना दगड हे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरावर उडून लागत असून या उघडे पडलेल्या दगडामुळे अनेक मोटर सायकल व सायकल वाले अपघात झाले असून येथील नागरिकांनी सदर रस्ता हा डांबरीकरण करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली

आहे परंतु या भागातील बरेच रस्त्याची डांबरीकरण झाले असून हा रस्ता मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने जाणून-बुजून दुर्लक्षित केला असून त्याचे काम केले नाही असा आरोपीतील नागरिकांनी केला असून सदर रस्ता हा दाढ खुर्द गावाकडे तसेच लोणी सोनगाव राहुरी संगमनेर कडे जाण्यासाठी तसेच शाळकरी मुलांची मोठी वर्दळ या रस्त्याला असून हा रस्ता मुख्य रस्ता म्हणून असून सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी आपले लक्ष केंद्रित करून सदर रस्ता हा येत्या 15 दिवसात तात्काळ कोणत्यातरी निधीत बसून मंजूर करावा अन्यथा येथील येथून पुढे होणाऱ्या निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जमधडे रिपब्लिकन पक्षाचे शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे माऊली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश राव वाघमारे काँग्रेसचे गटनेते किशोर जोशी मल्हार सेनेचे हरिभाऊ जोरी लहुजी सेनेचे दगडू भाऊ साळवे डॉक्टर राजेंद्र साळवे गणेशराव जोरी कैलासराव जोरी शंकर जोशी आधी प्रमुख कार्यकर्त्यांनी सदर रस्ता हा तात्काळ मंजूर करावा अन्यथा रस्ता रोको केला जाईल असा इशारा दिला आहे

सार्वजनिक बांधकाम विभागांनी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सदर रस्त्याची पाहणी करून तात्काळ या रस्त्याला मंजुरी द्यावी सदर रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून सदर रस्त्यांमध्ये दुधाच्या गाड्या बैलगाड्या अडकत असून पलटी होतात त्यामुळे छोटी मोठे अपघाती अनेक वेळा झाले असून जयंतीच्या अडचण समजून तात्काळ रस्त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे
