संगमनेर | झुंजार न्यूज
देशातील अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या वर्षापासून इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रमुख क्षेत्र बनलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड टाटा सायन्स या पदवी अभ्यासक्रमाला नव्याने मान्यता मिळाली असून आयटी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या कोर्सच्या प्रवेश क्षमतेतही वाढ करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ व्यंकटेश म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला नेक चा ए प्लस दर्जा आहे. गुणवत्तेबरोबर उत्कृष्ट निकालामुळे यावर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 507 विद्यार्थ्यांना चांगल्या पगारावर नोकऱ्या मिळाल्या आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स हे एकविसाव्या शतकातील नवीन क्षेत्र आहे. मशीनला तोंडी आदेश देऊन चित्रे ओळखता येतात ,कार चालवतात, गेम खेळतात व मानवाच्या कार्यपद्धती पेक्षा बरेच चांगले काम करता येते .या तंत्रज्ञानात उत्कृष्ट करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सध्या मोठा ओढा असतो. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ग्रामीण भागात ए आय सी टी ए कडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून या वर्षापासून प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच आयटी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन ची प्रवेश क्षमता ही वाढवण्यात आली आहे. मागील वर्षापासून ऑटोमेशन अँड रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुरु झाले आहे.

महाविद्यालयातील दर्जेदार सुविधा, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सह असलेल्या निसर्ग संपन्न परिसर ,प्लेसमेंट ची सुविधा, शिस्तबद्ध वातावरण यामुळे विद्यार्थी व पालकांचा नेहमी ओढा अमृतवाहिनीकडे राहिला आहे.या नवीन कोर्सला मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, प्रा विजय वाघे यांनी अभिनंदन केले आहे.

चौकट
प्रवेशासाठी सुविधा केंद्र अमृतवाहिनी हे जिल्ह्यातील शिक्षणाचे मध्यवर्ती ठिकाण असून विद्यार्थी व पालकांना इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रवेशा करता मार्गदर्शनासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे
