संगमनेर | झुंजार न्यूज
ध्येय व स्वप्न उराशी बाळगून विदयार्थ्यानी प्रयत्न व मेहनत केल्यास यश निश्चित येते मग तो कुठलाही विदयार्थी असो स्वप्न बघून वाटचाल करा मेहनतीचे फळ मिळते असे आवाहन अनलॉग अस्ट्रोनट म्हणून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्रध्दा गुंजाळ यांनी केले .

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ” येथील आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ‘ अवकाश संशोधन ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना गुंजाळ बोलत होत्या .

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस व अब्दुल कलाम वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस या दोन सन्मानाच्या मानकरी ठरणाऱ्या श्रद्धा गुंजाळ यांची युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये निवड झाली आहे. नासामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर जगभरातून निवडलेल्या सहा जणांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. एका शेतकऱ्याची मुलगीला अंतराळाबद्दल आकर्षण होते व अंतराळवीर होण्याचे स्वप्न तिने पाहिले आपले स्वप्नपूर्तीसाठी जोमाने अथक प्रयत्न केले .आपला हा संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला .

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बर्डे सर यांनी श्रध्दा गुंजाळ हीचा सत्कार केला .
चौकट :
सन 1979 -1980 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने विद्यालयातील इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचे दिलेले संच हे श्रद्धा गुंजाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले हया सर्व माजी विद्यार्थ्यांनी जवळ जवळ हया गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी 29000 किमतीचे पुस्तके खरेदी केले .
