संगमनेर | झुंजार न्यूज
महाराष्ट्राच्या संस्कृतीत एकतेचे प्रतीक असलेल्या पंढरपूरच्या वारीचा आनंद डॉ देवेंद्र ओहोरा मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून घेतल्या असून पायी दिंडी करून हे चिमुकले वारकरी आषाढी वारीत सहभागी झाले होते.
ओहरा मतिमंद व मूकबधिर विद्यालयाच्या प्रांगणात या मूकबधिर व मतिमंद मुलांची आषाढी वारी संपन्न झाली. यावेळी मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, हिरालाल पगडाल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष विद्यार्थी असलेल्या या मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची सुंदर वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा जयघोष केला. संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रखुमाई, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी यांच्या केलेल्या विविध वेशभूषा या मुख्य आकर्षण ठरल्या.
यावेळी प्रा. पगडाल म्हणाले की, वारी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या वारीत मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थी सहभागी होऊन हा आनंद घेता येत हा आनंद सोहळा खरोखरच अविस्मरणीय आहे. या चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा ही अत्यंत आकर्षक असून सर्वांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे असेही ते म्हणाले
तर चांगदेव खेमनर म्हणाले की, माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. ना बाळासाहेब थोरात v आ डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मूकबधिर व मतिमंद शाळा राज्यात आदर्शवत ठरली असल्याचे ते म्हणाले.
या आषाढी वारीच्या यशस्वीतेसाठी
जाधव मॅडम, गोरे सर, भालेराव सर, गुंजाळ मॅडम, श्रीमती देशमुख, स्नेहल सोनवणे, पवार ताई, प्रवीण थोरात, विक्रम यादव, रमेश घोलप, गुळवे ताई आदींनी विशेष परिश्रम घेतले
