संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ असणाऱ्या म्हसे वस्ती जि प प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी वारकरी पेहराव परिधान करत ” हरी नामाच्या ”  जयघोषणेत पायी दींडी काढली . या चिमुकल्या दींडीला निळकंठेश्वर प्रतिष्ठानावतीने राजगिरे लाडूचे वाटप करण्यात आले .
या चिमुकल्याची पायी दींडी म्हसे वस्ती जिल्हा परिषद शाळा ते  बाजार पेठ , बस स्टँड , विठ्ठल मंदिरापर्यत आली ही दींडीचे ग्रामिण वारकरी पोषाख , विठू माऊली विविध प्रकारे होणाऱ्या घोषणा आकर्षण ठरले . यावेळी अनिल म्हसे , विजय म्हसे , अनिल कंगनकर , तुषार म्हसे , भारत म्हसे , गणेश गायकवाड आदीसह निळकंडेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने चिमुकल्यांना राजगीरे लाडूचा प्रसाद देण्यात आला .
  पायी दींडी यशस्वी करण्यासाठी मेचकर , सौ कुऱ्हाडे , सौ लांडगे , सौ बिडवे मॅडम, सौ क्षीरसागर , सौ शिंदे , ढगे , शिंदे आदी शिक्षकांनी प्रयत्न केले 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *