संगमनेर । झुंजार न्यूज
” वृक्ष वल्ली आम्हास विठ्ठल,
बालपन हीच आमुची पंढरी ||
विद्यार्थ्यी आम्हास पांडुरंग,
त्यांस घडवू , हाच ध्यास -हाच अभंग ||
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज पर्यावरणाचा संदेश देत पाणी बचत, झाडे लावा,झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, या संकल्पनेतून परिसरातील आश्वी,शिबलापूर,पानोडी परिसरातील गावातून ही पर्यावरण वारी काढत पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले.
गावोगावी ही पर्यावरण वारी जात लेझीम, भजनाद्वारे व बालपण च्या सल्पनेतून गजर जिवनाचा हे पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन करण्याचे काम केले. आश्वी, शिबलापूर.,पानोडी परिसरातील भाविक भक्तांनी दर्शन घेत पारितोषिक सहभागी झाले.
या दिंडी साठी चिमुकले झाड वारकरी बनून, आॅक्सिजन वारकरी, तुळशीवाले अशा विविध वेशभूषेत पर्यावरण वाचवण्याच्या घोषणा देत बालपण च्या चिमुकल्यांच्या या वारीचे आगमन बालपण विद्यालयाच्या देवराईत झाले. व विद्यार्थ्यांनी देवराईतील वृक्षातच विठुराया साकारला आणि विठुरायाच्या भजनात कीर्तनात विद्यार्थी तल्लीन होऊन बालपण स्कूल ची देवराई दुमदुमली. या दिंडी साठी बालपण च्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे व सर्व शिक्षकांनी अतिशय चांगले परिश्रम घेत शिस्तबद्ध नियोजन केले.
