संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील जिल्हा परिषद प्राथ शाळेतील इयत्ता पहिलाचा गुणवान विद्यार्थी चि. चेतन आनंदा गिते याचा शाळेतचं विदयार्थ्यासमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्ताने चि . चेतनच्या पालकांनी शाळेस रु ५ हजार रुपये देणगी देत विदयार्थ्याना भोजन दिल्याने शाळा परिसरात आनंदी वातावरण दिसून आले .

चि. चेतन या विद्यार्थ्यांस मुख्याध्यापक राजू भुसाळ सर,शिक्षक सुभाष खेमनर सर, बाळासाहेब पर्वत सर , किशोर बिडवे सर ,व सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष चांगदेव गिते यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या .

यानिमित्ताने आनंदा गिते पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.तसेच शाळेस रोख स्वरूपात 5000/-(पाच हजार रु)भरीव देणगी देण्यात आले . याबद्दल सौ.मनीषाताई आनंदा गिते(सदस्या-शाळा. व्य. समिती) व आनंदा(अनिल) छबूराव गिते पाटील(स्वामी समर्थ दूध डेअरी संकलन केंद्र, पिंप्री लौकी) यांचे गावातून अभिनंदन होत आहे . 

चौकट

भविष्यात लोकांनी आपल्या मुलांचे वाढदिवस अशा चिमुकल्यासमवेत केल्यास मुलामध्ये एक आपुलकी , प्रेम निर्माण होवून त्याच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणी होईल तर सामाजिक दायित्वातून शाळेस मदत होईल

आनंद गीते (पिंप्री लौकी अजमपूर )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *