संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या खळी येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्था संगमनेर संचलित सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पंढरपूर यात्रा निमित्त व आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील सर्व बाळ गोपाळांची वारकरी पोषाक परिधान करुन पायी दिंडी मोठ्या उत्साहाने संपूर्ण गावातून काढत एकतेचा व भक्तीचा संदेश दिला .

यावेळी शाळेतील मुला – मुलीनी वारकरी सांप्रदायातील वस्त्र अंगावर परिधान करत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हातामध्ये झेंडे घेऊन पांडुरंगाच्या हरिनामाचा गजर करत संपुर्ण गावातून पायी दिंडी काढली . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक होडगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक गजानन वाणी सर , मोरे सर , दिवटे सर , श्रीमती शिंदे , कर्मचारी शंकर जोशी व आप्पासाहेब वाघमारे मामा यांनी पायी दिंडीचे सुंदर असे नियोजन करून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर भक्ती , शक्ती मार्ग दाखविला .

 यावेळी विद्यार्थिनींनी वारकरी पध्दतीची साडी परिधान करत डोक्यावर तुळस घेवून टाळ मृदुंगच्या गजरामध्ये मोठया उत्साहाने सहभागी झाल्या . पायी दींडी चौका – चौकातून नेत पांडुरंगाच्या जयघोष देत संपूर्ण गाव भक्तीमय केले .

यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह शिक्षकांनी फुगडीचा आनंद घेत दिंडीचे आकर्षण निर्माण केले . यामध्ये ग्रामस्थ सहभागी झाले होते . विद्यार्थीना शिक्षकांनी कलागुणाला वाव दिल्याने शिक्षकांचे अभिनंदन होत आहे .

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाचे वस्त्र परिधान करून बाळ गोपाळान आषाढी एकादशीचा आनंद लुटला असून पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत गावातील चौकाचौकातून पायी चालत दिंडी काढली शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दिवेकर , वावरे सर शिक्षिका श्रीमती बोरुडे मॅडम आदींनी मार्गदर्शन केल .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *