संगमनेर / झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मालुंजे ग्रामपचायतीचे लिपिक संतोष शंकर खरात यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्रॉईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या संगमनेर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
नगर येथे झालेल्या राज्य कार्यकारणी बैठकी प्रसंगी राज्य अध्यक्ष एन एम पवळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .
संतोष खरात हे गेल्या १५ ते २० वर्षापासून मालुंजे ग्रामपचायतीत लिपिक म्हणून काम करत असून तालुक्यातील बहुतांश असणार्‍या कर्मचार्‍याशी सलोख्याचे संबंध ठेवून त्याच्या वेळोवेळी येणार्‍या समस्या सोडवत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करताना दिसत आहे .  
यावेळी राज्य अध्यक्ष एन एम पवळे , महासचिव डॉ देवानंद वानखेडे , संघटक सचिव जे एन भिवदर्णे , नगर उपाध्यक्ष वसंतराव थोरात , प्रा सुहास धिवर , संरपच महासंघाचे तालुकाध्यक्ष संदिपराव घुगे , मालुंजे संरपच सौ सुवर्णाताई घुगे , ग्रामसेविका वालझाडे आदीनी अभिनंदन केले .
चौकट 

कास्ट्रॉईब कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पचायत समिती व ग्रामपचायत कर्मचार्‍यांना निर्माण होणार्‍या समस्या सोडवून त्यांच्या न्याय करता सातत्याने पुढाकार घेणार 

संतोष खरात ( तालुकाध्यक्ष , महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संगमनेर )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed