संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील दाढ खुर्द येथील अहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित दाढ खुर्द संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.त्यात संस्थेच्या चेअरमन पदी भास्कर विठोबा जोरी व व्हा.चेअरमन पदी ज्ञानेश्वर नामदेवराव वाडगे यांची बिनविरोध निवड झाली.
अहिल्यादेवी पतसंस्थेच्या संंचालक पदी नारायणराव कहार, भास्करराव जोरी, सिताराम साळवे, ज्ञानेश्वर वाडगे, बाबासाहेब पर्वत, अशोक जोशी, विकास जोशी, नानासाहेब जोशी,संपत बोर्हाडे,सौ.जनाबाई जोशी, पुनाबाई कहार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यानंतर चेअरमन,व्हा.चेअरमन निवडणुक पार पडली.चेअरमन पदासाठी श्री.भास्कर विठोबा जोरी यांच्या नावाची सुचना नारायणराव कहार यांनी मांडली व त्यास बाबासाहेब पर्वत यांनी अनुमोदन दिले.व्हा.चेअरमन पदासाठी श्री.ज्ञानेश्वर नामदेवराव वाडगे यांच्या नावाची सुचना सिताराम साळवे यांनी मांडली व त्यास सौ.जनाबाई जोशी यांनी अनुमोदन दिले. त्यांची बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणुक यशस्वी करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी ए. एस.शेख यांनी काम पाहिले. त्यांना मॅनेजर राजेंद्र गायखे व संतोष बनगैय्या यांनी सहकार्य केले.
यावेळी प.डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक शांताराम महाराज जोरी, बाबासाहेब वाडगे, साहेबराव भांड, भिमराज बुधे, पुनाबाई कहार, कारभारी गो.जोशी, बाळकृष्ण जोरी, रमेश र.जोशी, त्रिंबक जोरी, भागवत जोरी,किसन पर्वत, संतोष पर्वत, नारायण जोरी, रामदास बिरे, पांडुरंग जोशी, ज्ञानदेव भांड, रामजी पर्वत आदि.उपस्थित होते. सदर अहिल्यादेवी पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्या बद्दल सर्व संस्थेच्या सभासदांनी तसेच दाढ खुर्द ग्रा.सरपंच सतिश जोशी,दाढ खुर्द वि.विकास सोसायटी चेअरमन मनोहर जोशी यांनी अहिल्यादेवी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले व आभार मानले.
