संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील समाजसेवक म्हणून परिचीत असणारे भारत अंबादास शेवाळे यांना संरपच सेवा संघातर्फे समाजभूषण हा राज्यस्तरिय पुरस्कार आदर्श संरपच भास्करराव पेरे व हवामान व पाऊस तज्ञ पंजाबराव डंख यांच्या हस्ते देण्यात देण्यात आला .

भारतराव शेवाळे हे गेल्या ५ – ६ वर्षापासून नि स्वार्थीपणाने समाजसेवा करत असून लहानग्या पासून तर वृद्धापर्यत असणार्या व्यक्तीना सहकार्याची भावना ठेवून व तातडीने त्याच्या समस्यांचे निवारण करताना दिसत आहे महारुद्रा फांऊडेशनची स्थापना करुन गरजवंताना मदत करणे हेच ध्येयवेध शेवाळे यांच्या अंगिकारलेले आहे यांची पावती म्हणून संरपच सेवा संघाने त्यांना राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्कार आदर्श संरपच भास्करराव पेरे , हवामान व पाऊस तज्ञ पंजाबराव डंख यांच्या हस्ते देवून सन्मानीत केले आहे .

यावेळी त्रिमुर्ती संकूलचे संस्थापक साहेबराव घाडगे , डॉ सुधा कांकरिया , संरपच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव , भाऊराव कदम , पत्रकार राजेंश गायकवाड , रमेश मुंढे आदीसह मोठ्या संख्येने पुरस्कारकर्ते उपस्थित होते .

