संगमनेर । झुंजार न्यूज

केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलासराव राजाराम कासार यांना संरपच सेवा संघाच्या वतीने नुकत्याचं समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले .
नगर येथे झालेल्या पुरस्कार वितरणात आदर्श संरपच भास्करराव पेरे व हवामान व पाऊस तज्ञ पंजाबराव डंख यांच्या हस्ते कैलास कासार यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला . कासार यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गोर गरिब , मागसवर्गिय , आदीवाशी सह विविध घटकांतील लोकांच्या समस्या सोडविण्याचे सातत्याने प्रयत्न करत असून अडी – अडचणीच्या काळात लोकांच्या सेवेशी नेहमी तत्पर असणारे शहरातील तरुण व्यक्तीमत्व असल्याने संरपच सेवा संघाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना समाजभूषण पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला .
यावेळी त्रिमुर्ती शिक्षण सकुलचे अध्यक्ष साहेबराव घाडगे , डॉ सुधा कांकरिया , पत्रकार राजेंश गायकवाड , संरपच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे , राम दारोळे , आनंद बनबेरु , सिद्धार्थ दारोळे
, किरण जमदडे , महेश जेधे ,  सुनील रुपवते आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *