संगमनेर । झुंजार न्यूज
बेरोजगारी ही राज्यापुढील सर्वात मोठी समस्या असून यावर मात करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी दु. 1 वा. मालपाणी लॉन्स येथे स्वयंरोजगार, व्यवसाय व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिली आहे.
बेरोजगारी ही राज्याची व देशाची सर्वात मोठी समस्या असून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी व युवकांना योग्य मार्गदर्शन करण्याकरता जयहिंद लोक चळवळीच्या वतीने मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता मालपाणी लॉन्स येथील बँक्वेट हॉलमध्ये या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन होत आहे. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात हे उपस्थित राहणार असून याप्रसंगी तरुणांना यशस्वी व्यवसाय कसा करावा याबाबत आनंद गोडसे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात व्यवसाय कसा निवडावा व व्यवसाय वृद्धीसाठी करावयाच्या उपायोजना यासाठी तज्ञ मार्गदर्शिका ऐश्वर्या कुलकर्णी या मार्गदर्शन करणार आहेत.
युवकांना करिअर बाबत जयहिंद लोक चळवळीच्या वतीने सातत्याने मार्गदर्शन केले जात असून याबाबत विविध उपक्रमही राबवले जात आहेत.यात नोकरी मेळावे, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, भाषेवरील प्रभुत्व, वाचन चळवळ यांसह अनेक उपक्रम राबवले आहेत.
व्यवसायामध्ये कल्पनांना त्याचप्रमाणे त्यामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या शास्त्रीय दृष्टिकोनांना खूप महत्त्व असून आपल्याकडील छोटे छोटे व्यवसाय करणारे तरुण आहेत त्यांना चांगले मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या कल्पना जगापर्यंत पोहोचावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे.
शहरात व तालुक्यातील युवकांना नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर या शिबिराचा नक्की मोठा लाभ होणार असून या शिबिरामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख सोमेश्वर दिवटे,कमलेश उनवणे व अनंत शिंदे, अभय जोंधळे यांनी केले आहे.
