शिर्डी । झुंजार न्यूज

कला क्षेत्रात सर्वात प्रथम स्टेजवर नृत्य सादर करणाऱ्या आदयनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांनी पुरुष सत्ताक / सनातनी व्यवस्थेला झुगारुन मोठ्या धाडसाने सर्व प्रथम स्टेजवर नृत्य सादर केले . महाराष्ट्राच्या लोककला लावणीला राष्ट्रीय पातळीच्या उंचीवर पोहचविणे व लावणी सन्मान मिळवून देण्याचे मोठे कार्य नामचंद पवळादेवी भालेराव यांनी केले याचं नामचंद कलाकाराची घोर उपेक्षा महाराष्ट्र सरकारनी केले त्यांच्या जन्म गांवी हिवरगांव पावसा येथे त्याच्या स्मारकास मंजूरी दिली मात्र निधी अभावी कामचं अधुरे ठेवण्याचे काम राज्य शासनाने केल्याने नामचंद पवळादेवी भालेराव यांचे स्मारक तातडीने बनविणे व  शालेय पुस्तकामध्ये त्याच्या कलेचा वारसा वाचनिय म्हणून राज्य शासनाने घ्यावे याकरिता संगमनेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने तहसिलदाराला निवेदन दिले .
या निवेदना म्हटले आहे की , नामचंद पवळा देवी भालेराव ह्या ग्रामिण भागातून स्टेजवर नृत्य सादर करणाऱ्या पहिल्या महीला होत्या त्यांनीचं लोककला ( तमाशा) ला संजीवनी प्राप्त करुन दिली . पुरुष प्रधानकीला झुंगारुन पवळादेवी तमाशा एक सास्कृतिक कलेला महत्व प्राप्त करुन दिले अशा अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा या छोट्याश्या गावांत त्यांच्या जन्म झाला . कलेला जीवंत ठेवण्यासाठी त्यांच्या नातवाने चांगदेव भालेराव यांनी एक सामाजिक संस्था उभारुन त्या माध्यमातून एक प्रशिक्षण केंद्र उभारले सरकारी दरबारी वेळोवेळी पाठ पुरावा करत संस्था कशी बशी चालविली मात्र शासना कडून घोर अपेक्षा झाली . पवळादेवी भालेराव यांचे स्मारकाकरिता निधी देवू हे आश्वासनाचे शासनाला विसर पडला . आज १२ ऑगस्ट रोजी पवळादेवीचा जन्म दिवस असताना हे स्मारक त्वरीत पुर्ण करण्यासाठी आता सामाजिक ,  रिपाईसह विविध संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन आंदोलन करणार असल्याचा ईशारा रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार यांनी निवेदनाद्रारे दिला आहे  .
तहसिलदारला निवेदन देताना तालुकाध्यक्ष आशिष शेळके , शहराध्यक्ष कैलास कासार , युवा तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे , महीला तालुकाध्यक्षा सौ रुपाली सोनवणे , सौ मिना बिडगर ,  विजयराव खरात , मधुकर सोनवणे ,  जर्नाधन साळवे , रमेश भोसले , दिपक खरात , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , केरनाथ भोसले , संपत भोसले , सागर शिंदे , शरद तपासे , विकास गायकवाड , लक्ष्मण मेडे , गौतम वर्पे आदी उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed