झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेची पायी ज्योत आणण्याचा धार्मिक उपक्रम यंदाही उत्साहात सुरू करण्यात आला. मंडळातील सुमारे ७० युवक आज सकाळी तुळजापूर येथून पायी ज्योत घेऊन तुळापूरकडे रवाना झाले.

यावेळी तुळापूरचे सरपंच दादासाहेब हारदे तसेच तुळजाभवानी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेची विधिवत पूजा व आरती करून पवित्र ज्योतीचा प्रारंभ करण्यात आला.

मंडळातील तुळजाभवानी मातेचे भक्त ही ज्योत पायी राहुरी तालुक्यात घेऊन येणार असून, मार्गातील विविध गावांमध्ये ज्योतीचे उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले जात आहे. भक्तिमय वातावरणात युवकांचा हा पायी प्रवास सुरू असून, गावोगावी नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सलग तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेची ज्योत पायी आणण्याची परंपरा जपली जात आहे. श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

यंदाही हा धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडत असून, तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *