{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील शिरसाठ दांपत्य पाथरे – कोल्हार रस्त्यावरून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या जीवघेण्या प्रसंगातून ते बालंबाल बचावले.

पाथरे येथील जगदीश दत्तात्रय शिरसाठ व त्यांच्या पत्नी सौ. निकिता जगदीश शिरसाठ (वय २६ हे काही कामानिमित्त रात्रीच्या वेळी घरून कोल्हारकडे जात असताना पाथरे – कोल्हार रस्त्यावर खडके पाटोळे – शिंदे वस्तीजवळ त्यांना रस्त्यावर मोटारसायकलच्या प्रकाशात दोन पिल्ले दिसले. त्यांना वाटले सशाची पिल्ले आहेत असे समजून ते पिल्लांजवळ गेले. गाडी जवळ जाताच रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला केला. यात सौ. निकिता यांच्या पायाला बिबट्याच्या नखांनी जखमा झाल्या. सदर घटना रात्री ७.३० वाजता घडली. प्रसंगावधान राखत ते त्या ठिकाणावरून सुखरूप निघून गेले.

माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांनी जखमी शिरसाठ कुटुंबाशी संपर्क करून वैद्यकीय उपचार घेण्यास सांगितले व अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. घटनेची माहिती अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, कोपरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना देण्यात आली.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख, मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के, वनरक्षक प्रतीक गजेवर हे सकाळी घटना स्थळी पोहचले व पंचनामा करून निकिता शिरसाठ यांना तातडीने नगर सिव्हिल येथे जाण्यास सांगितले. यावेळी पाथरे बुद्रुक चे सरपंच उमेश घोलप, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब कडू, टिंकल कडू, आशिष शिंदे, बाबासाहेब शिरसाठ, दत्तात्रय शिरसाठ, नवनाथ शिरसाठ, बापू शिरसाठ हजर होते.

नवरात्र उत्सव सुरु झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हार-भगवतीपूर येथील भगवतीदेवी आणि पाथरे बुद्रुक येथील रेणुका माता मंदिर या ठिकाणी आरतीसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. पहाटेच्या वेळी अथवा रात्रीच्या वेळी या रस्त्याने भाविक मोठ्या संख्येने पायी जात असतात. सद्यस्थितीत बिबट्याचे वास्तव्य या परिसरात असल्याने भाविकांनी सतर्कता बाळगावी. त्याचप्रमाणे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी संबंध वनविभागाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी पाथरे बुद्रुकचे सरपंच उमेश घोलप यांनी केली आहे.

तसेच या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. यावेळी असे समजले की आणखी एका मोटारसायकल स्वारावर बिबट्याने हल्ला केला परंतु स्थानिकांशी चौकशी केली असता त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. परंतु स्थानिक नागरिक बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली असून ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *