{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

ममदापूर व तिसगाव वाडी येथून चोरलेल्या दुचाकी हस्तगत; आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी

आश्वी । झुंझार न्यूज

लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन दुचाकींच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन्ही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी ममदापूर येथील शिव सावता कॉम्प्लेक्स येथे मजुरीसाठी आलेले राजस्थान येथील प्रल्हाद कुमार हे वास्तव्यास होते. रात्रीच्या वेळी त्यांची RJ 33 SH 7039 क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 444/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 449/2026 नुसार तिसगाव वाडी येथील एका शेतकऱ्याची शेतात काम करत असताना शेताच्या कडेला लावलेली MH 17 R 2133 क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणीही लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना राहुरी पोलीस ठाण्यात BNS कलम 303 अन्वये दाखल गुन्ह्यात प्रकाश जयराम पवार (वय 25, रा. आठवाडी बेलापूर, ता. श्रीरामपूर) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या मोटारसायकली पोलिसांना मिळून आल्या.

पोलिसांनी प्रकाश पवार याच्याकडे चौकशी केली असता त्याने ममदापूर आणि तिसगाव वाडी येथूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर लोणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पंचांसमक्ष त्याच्या घरी जाऊन चोरी केलेल्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या.

आरोपीने दुचाकी चोरी करताना कोणाची मदत घेतली होती, चोरी केलेल्या दुचाकी कोणाला विकणार होता तसेच त्याने यापूर्वी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीला आज राहाता न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.

परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ राशिनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *