संपुर्ण देशामध्ये २०२४ ची लोकसभेकरिता सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून तिसर्यांदा भाजपा सत्तेत येण्यासाठी तर देशात परिवर्तनासाठी सर्व पक्षीय आघाडी आपली चक्रव्युह रचना आखत असून शिर्डी लोकसभेकरिता एक वर्षापुर्वीचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रयत्न सुरु केले तर पुन्हा खासदारकीचे स्वप्न पाहणारे भाऊसाहेब वाकचौरे सेनेत दाखल झाल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघाकरिता अनेक इच्छुकांची रेलचेल सुरु असल्याचे दिसून येत आहे .
या मतदारसंघासाठी २०१९ च्या निवडणुकीत तगडी फाईट झाली आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे चार लाखांहून अधिक मत घेत संसदेत पोहोचले. याच मतदारसंघातून लढण्यासाठी कधी रामदास आठवले इच्छा व्यक्त केली तर कधी ठाकरे गटाकडून बबनराव घोलप यांचं नावाची चर्चा झाली. पण, आता लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिनेच बाकी असताना ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही नाव समोर आलंय आहे . नुकताचं मातोश्रीवर कार्यकर्त्यासह जावून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापशी करत हातात शिवबंधन बांधून आपली उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले जात आहे मात्र जर तरचा प्रश्न ठाकरे सेनेकडून घोलप की वाकचौरे हे लवकरचं समजेल .
२००९ ला शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती करिता राखीव झाला त्यामुळे रामदास आठवले यांनी सर्व प्रथम या मतदार संघाला पसंती दिली मात्र रिपाई व राष्ट्रवादी कॉग्रेसची तेव्हा आघाडी होती तर कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत शिर्डी कॉग्रेसकडे असल्याने शरदराव पवार यांनी आठवले यांना कॉग्रेसकडे जागा मागण्यास सागितले मात्र जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी हायकंमाडकडे आदलाबदली प्रस्ताव ठेवला यास पवाराकडून रिसस्पॉन्स न मिळल्याने अगदी उशिरा रामदास आठवले यांना निवडणुक लढण्याची समंती मिळाली . विखे – थोरात – पिचड – कोल्हे – ससाणे – गडाख हे तगडे सेनापती असल्याने आपला विजय निश्चित होईल या भ्रमात रामदास आठवले राहिले आपल्या कार्यकर्त्याची फौज उभी करत विजयचा रथ घेवून आठवले पुढे जावू लागले तर भाऊसाहेब वाकचौरे कोण आहे हे कोणाला माहिती नसतानाचं आपल्या राजकारणाच्या एन्ट्रीलाच दिग्गजाचा पराभव केला . मात्र त्यानंतर राजकारणात मोठ्या प्रमाणात उलधा- पालध्या झाल्या . तगडी फौज असताना सुद्धा सर्वसामान्य माणसाकडून पराभव झाल्याने आठवले यांनी कॉग्रेस – राष्ट्रवादीशी फारकत घेत तिसरी आघाडी काढली कमी कालावधीतचं तिसर्या आघाडीने मोदीला साथ दिली .
आज रामदास आठवले हे भाजपासोबत असल्याने पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या आग्रह खातर गेल्या वर्षापासून निवडणुकीच्या तयारीत आहेत मात्र येथे आता ठाकरे गट , कॉग्रेस , शरद पवार गट अशी आघाडी आहे तर रिपाई – भाजपा – शिंदे सेना – अजित पवार गट आहे विखे – पिचड – कोल्हे हे भाजपाच्या कळपात तर काळे ( अजित पवार गट ) मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातलं गणित नेमकं काय? ठरेल सांगता येत नाही संध्या एकनाथ शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे खासदार आहेत . तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीचं व्यक्त केली. त्यानुसार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे सेनेत जावून शिवबंधन हाती घेतल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती मिळू लागली आहे .
भाऊसाहेब वाकचौरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातील. प्रशासकीय सेवेत असताना सात वर्ष साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी, त्यामुळे दांडगा जनसंपर्क. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेबांनी रामदास आठवले यांचा पराभव केला . मात्र, लगेचच पुढच्या म्हणजेच २०१४ च्या निवडणुकीत शिवबंधन झुगारून त्यांनी काँग्रेसचा हात धरला. २०१४ साली शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली मात्र, मोदी लाटेत युतीच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून वाकचौरेंना पराभव स्वीकारावा लागला.
सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सदाशिव लोखंडेंकडे आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. अशातच आता सदाशिव लोखंडे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतभाऊसाहेब वाकचौरे हे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांची ठाकरेसेनेत एन्ट्री झाल्याने निष्ठावान शिवसैनिक काय भूमिका घेणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे शिर्डीत आले होते. तेव्हा त्यांनी मंचावरून बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार बबनराव घोलप यांनी लोकसभा मतदारसंघातील गाठीभेटी आणि पक्षाचे कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली . मात्र, आता भाऊसाहेब वाकचौरे यांच्या एन्ट्रीने सगळी गणितं बदलू शकतात. दुसरीकडे केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. आठवले यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने लोखंडे यांचे टेन्शन वाढू लागले यामुळे शिंदे गट शिर्डीची जागा रामदास आठवलेंना सोडणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( भाजपा / रिपाई ) , सदाशिव लोखंडे ( शिंदे सेना ) बबनराव घोलप , भाऊसाहेब वाकचौरे ( ठाकरेसेन ) , उत्कर्षा रुपवते ( कॉग्रेस ) यांच्यासह अनेक आघाडीच नेते शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीकरिता तयारी दिसत आहे मात्र बदलेल्या राजकीय घडामोडींनंतर मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. शिर्डीच नवा शिलेदार कोण असणार यात विखे पाटील यांची ही भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे .
चौकट
भाऊसाहेब वाकचौरे यांची ठाकरे सेनेच्या घरवापशी मुळे व रामदास आठवले करिता भाजपाने शिर्डीची जागा सोडली असल्याच्या चर्चावरुन २००९ ची पुनरावृत्ती ठरणाची चिन्हे दिसत असली तरी बदलत्या राजकारणावरुन विखे पाटील यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.