केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्हयातील रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी बरखास्त असल्याचे रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे व जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
प्रसिद्धी पत्रकामध्ये पुढे म्हणाले की , अहमदनगर जिल्ह्यात वर्षानुवर्षे आंबेडकरी विचारांच्या व तळागाळात एकनिष्ठेने काम करणारे असंख्य कार्यकर्ते व महिलां आहे प्रत्येकाला पक्षाच्या विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी ही धारणा पक्षाची असल्याने २०२४ लोकसभा , विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील महिला आघाडी सक्षम करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी संध्या स्थितीत असणारी रिपब्लिकन महिला आघाडी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे ना रामदास आठवले यांच्या आदेशाने लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेवून नविन महिला आघाडीची घोषणा होईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांन दिली
सुरेंद्र थोरात पुढे म्हणाले की , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्य नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिपाई पक्षाची वाटचाल सक्षमपणे चालू आहे . संध्याची राजकिय वाटचाल बघता महिलां ह्या मोठ्या प्रमाणात संघटनेत काम करण्यास पुढे येत आहे . रिपाई च्या अनेक मोर्चा , आंदोलन व राजकिय कार्यक्रमात वर्षानुवर्ष महिला तन – मन – धनाने व नि:स्वार्थीपणे काम करताना दिसत आहे . महीला आघाडी सक्षम करण्यासाठी होतकरु व नविन महिलांना संघटनेत काम करण्याची संधी मिळावी या धोरणातून आता पक्षाची वाटचाल होणार असल्याने वर्षानुवर्ष त्याचं त्या महिलाना काम करणे शक्य होत नाही तेव्हा संघटनेत बदल होणे आवश्यक आहे . हे नेतृत्वाची इच्छा आहे त्यामुळे भविष्यात रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून महिला आघाडी सक्षम होण्यावर भर असल्याने संध्याची रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी बरखास्त करण्यात आली आहे लवकर राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे व संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नविन आघाडीची घोषणा होईल .