संगमनेर । झुंजार न्यूज
अंतरवली सराटी ता.अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मनोज जरंगेपाटील हे गेली सात ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत, परंतु 1 सप्टेंबर 2023 रोजी अचानक पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीकाठी, अश्रूधूर व फायरिंग च्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हा आदेश देणाऱ्या व हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केली आहे .
अंतरवली सराटी या गावात उपोषण करून 50% आतील ओबीसी प्रर्वगातुन मराठा आरक्षण मागणी करत आहेत. या आदोंलनाची खुद मुख्यमंत्री यांनी दखल घेतली होती आणि संविधानिक मार्गाने उपोषण आंदोलन चालू होते पण दि.1 सप्टेंबर 2023 रोजी अंतरावली सराटी या आंदोलन ठिकाणी अचानक शेकडो संख्येने लाठीकाठी व बंदुका घेऊन पोलीस आले आणि शांततेत सविधानीक मार्गाने आंदोलन करत असलेल्या आंदोलकावर प्रथम आंदोलन सोडावे म्हणून जोरजबदस्ती आणि ऐकत नाही म्हणाल्यावर पोलिसांनी उपस्थित लहान मुले महिला वयस्कर आंदोलकावर जोरदार जनावरांनाही अशा पद्धतीने मारहाण करत नाहीत अशी मारणार करू लागले वातावरण चिगळले पोलीस ऐकायला तयार नव्हते आंदोलक ओरडून ओरडून सांगत होते की आम्हास मारहाण करू नका आम्ही सविंधानीक मार्गाने शांततेत आंदोलन करत आहोत पण पोलीसांनी त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलकावर अजुन जोरजोरात लाटीचार्ज केला फायरींग केली त्यामुळे लोकशाही सुव्यवस्थेला काळीबा फासणारी गोष्ट या शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. ही पोलीसांची हिटलर शाही या यापुढे लोकशाहीत खपून घेतली जाणार नाही.
या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा. आणि मा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपल्याकडील विशेष अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी, पोलीस एस पी , डीवाय एसपी याना राज्य घटना अनुच्छेद 311 ब 2 खाली सेवेतून कायमची हकालपट्टी करावी. या निंदनीय घटनेने लोकशाही सुव्यवस्थेला काळीबा फासला आहे तरी उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल त्याचबरोबर मराठा समाजाला 50% आतील ओबीसी प्रर्वगातुन मराठा आरक्षण द्यावे या मागणीचा एक गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे या निवेदनावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे , दिनकर घुले, एकनाथ नाना शेळके ,संदीप खुळे, मारुती सोनवणे,जगन गवांदे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
