संगमनेर । झुंजार न्यूज

 

हम यारों के है यार,वफादारों के लिए दिलदार’,हमसे मुकाबला न कर वरना घुमते रहोगे दर बदर!असा शेर पेश करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कव्वाली कार्यकर्माची रंगत वाढवली.अर्थातच विखे पाटील यांच्या शेरेबाजीतील राजकीय निशाणा कोणावर होता हे लपून राहीले नाही.

 

निमित होते शहरातील ख्वाजा महंमद सादीक बाबांच्या यात्रेचे,दरवर्षी याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.मंत्री विखे पाटील दरवर्षी येथे येवून दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतात.यावर्षी देशातील नामवंत गायक रईस अन्सारी साबरी यांच्या कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी ख्वाजापीर महंमद सादीक बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेणे म्हणजे वेगळी उम्मीद मिळते.एकता आणि शांतीचा संदेश देणारे स्थान संगमनेरची सांस्कृतिक ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मैफलीचा आनंद घेण्यासाठी आलो असलो तरी संगमनेरात आल्यानंतर काही तरी बोलावेच लागते असा उल्लेख करीत,सुना है दुष्मनों की गलीयो मे आजकल मातम है; लो हम आ गये,विकास का सुरज रोषन करने
या पहीलाच शेर पेश करीत मंत्री विखे पाटील यांनी असंख्य श्रोत्यांची दाद मिळवली.

मागील वर्षी याच ठिकाणी झालेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाची आठवण करून देत मंत्री विखे पाटील म्हणाले की मागील वेळेस दोस्तीचे आपील मी केले होते तेव्हा एकाने मला विचारले जब आपका दोस्त संगमनेर मे है..तो तुम्हारा यहाॅ क्या काम है;तैव्हा मी उतर दिले होते जहाॅ मेरा दोस्त नाकाम है,वही तो मेरा सबसे ज्यादा काम है,
वही तो मै कर रहाॅ हूॅ,आपके जो काम वो न कर सका,उसे मुझेही तो करना है
असा जोरदार टोला लगावीत हम यारों के है यार, वफादारों के लिए है दिलदार
हमसे मुकाबला न कर,वरना घुमते रहोगे दर बदर असा शेर पेश करीत त्यांनी जोरदार निशाणा साधला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed