संगमनेर । झुंजार न्यूज

 

विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या विविध योजना राबवून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे. हीच विकासाची घोडदौड कायम राखताना तालुक्यातील विविध गावांसाठी सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३५  लाख रुपयांचा निधी मिळवला असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात सातत्याने विकासाच्या योजना राबवताना पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांसाठी सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३५  लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.

या अंतर्गत धांदरफळ खुर्द श्री.बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी 20 लाख रूपये मंजुर, सायखिंडी प.पु. अमरगिरी महाराज खानेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी 7 लाख 50 हजार रूपये मंजूर, पारेगाव बु श्री.रेणुकामाता देवस्थान परिसर सुशोभीकरण करणेसाठी 7 लाख 50 हजार रूपये मंजूर झाला आहे. या निधीमधून या मंदिर परिसरामध्ये काँक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक बसवणे, लाईट सुविधा, पिण्याचे पाणी यांसह विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

या तीर्थक्षेत्रांना मिळालेल्या निधीबद्दल धांदरफळ खुर्द, सायखिंडी, पारेगाव बु येथील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले असून या मिळालेल्या निधीतून वरील विविध गावांमधील क तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामाला लवकरच होणार येणार आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed