श्रीरामपूर । झुंजार न्यूज
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी ची आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली
तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी पक्षाचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व एकलव्य समाज भुषण पुरस्कार प्राप्त तसेच आदिवासींचे (हॄदय सम्राट)श्री रेवणनाथ जाधव साहेब यांच्या उपस्थितीत आदिवासी समाजातील शैक्षणिक धोरण, सामाजिक, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी राज्य प्रवक्ते दत्तात्रय आगे साहेब व अहमदनगर जिल्हा कमिटी पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी नगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे श्री विठ्ठल सोनवणे साहेब (राज्य संपर्क प्रमुख) भिमा साळुंके, अनिल पवार, मारुती पवार, संजय जिरे, साईनाथ सोनवणे,प्रकाश पवार, बाबासाहेब साळुंके, चंद्रभान साळुंके,भिमराज माळी,भिमा पवार,सौ जयश्री भालेराव, पोपट माळी, रमेश पवार, मच्छिंद्र पवार दळवी साहेब यांची एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
यावेळी पक्षाबद्दल एक निष्ठेने राहण्याची आणि तळागाळातील समाजाला न्याय हक्क आणि वाचाफोडणारी एकमेव पक्ष एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच या अधिपत्याखाली समाजाचे हित तसेच बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी समाजाच्या सेवेसाठी सदर प्रयत्न करीत राहिल त्या करिता वेळेचे कुठलेही बंधन नाही असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्षाच्या अध्यक्ष यांना दिला आहे आदिवासी जोडो मोहीम समाज प्रबोधन करणे काळाची गरज आहे तसेच२०२४, २०२५ निवडणूक पक्ष लढवणार तसेच पदाधिकारी यांनी पदभार घेऊन बोगस फिरु नये तर प्रत्यक्षात भेटुन कामे मार्गी लावा जेथे अडचण निर्माण होईल तेव्हाच मला फोन करा गाव तेथे कार्यकर्ता गावं तेथे शाखा ओपनिंगचे कार्येक्रम सुरू करा पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागा आदिवासी बहुजन पार्टी चे आमदार खासदार कशाप्रकारे निवडून येतील ते काम करत रहावे कारण आपल्या पक्षाचे आमदार खासदार आणि जिल्हा परिषद विविध विषयावर चर्चा केली व तो पर्यंत आपले आमदार खासदार होत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्र्न चांगल्याप्रकारे सोडवता येत नाही म्हणून पक्षाचे हक्काचे आमदार खासदार निवडून आणले पाहिजे अशाप्रकारे सुचनाही देण्यात आल्या आहेत
