शुक्रवारी दूध संघाची तर रविवारी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

संगमनेर । झुंजार न्यूज

 

संपूर्ण देशासाठी सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेरच्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये होणार आहे यामध्ये दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 22 सप्टेंबर रोजी तर कारखान्याची 24 सप्टेंबर 23 रोजी होणार आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करणारा अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्था ह्या राज्यातील सहकारी संस्थांसाठी दीपस्तंभ प्रमाणे काम करत आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या या सहकारी संस्थांमधील संगमनेर शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वा  संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. तर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी 11 वा. चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूध संघात ही सभा होणार आहे.

तर दुपारी 4 वा. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शंकरराव पा. खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या आवारामध्ये होणार आहे. यावेळी नवीन पेट्रोल पंपाचा शुभारंभही करण्यात येणार आहे.

तर शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वा. कारखाना कार्यस्थळावर हरिश्चंद्र फेडरेशन व गरुड कुक्कुटपालन यांची वार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र गुंजाळ व राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सकाळी 11 वाजता वसंत लॉन्स नवीन नगर रोड येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तर रविवार दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वा. कारखाना कार्यस्थळ येथे कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सर्व सभांच्या वेळी माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांसह तालुक्यातील सर्व संस्थांचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभा साठी फक्त सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, अमृतवाहिनी बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे,शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन सुनील कडलग, बाजार समितीचे उपसभापती गीताराम गायकवाड यांसह सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालकांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed