शिर्डी । झुंजार न्यूज 

 

सिन्नर ते सावळीविहार या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या लोकसंख्येच्या प्रत्येक गावाजवळ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक उभारण्यात आले. नगर ते कोपरगाव रस्त्यावर मोठ्या लोकसंख्येच्या प्रत्येक गावात त्याची गरज असताना एकही स्कायवॉक नाही. स्कायवॉक अभावी शिर्डीत रस्ता ओलांडताना भाविकांचे हाल आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. सावळीविहीर, पिंपरी निर्मळ, बाभळेश्वर, कोल्हार आणि राहुरी येथेही अशीच परिस्थिती आहे. त्यातून बऱ्याचदा अपघात देखील होत आहेत.

साई संस्थानचे प्रसादालय पश्चिमेला आहे आणि साई मंदिर पूर्वेला आहे. मधोमध नगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्ग आहे. दररोज सरासरी चाळीस हजार भाविक साईदर्शनानंतर हा रस्ता ओलांडून प्रसादालयाकडे जातात. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर सुरू असते. वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन भाविकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. शेपन्नास भाविक रस्ता ओलांडू लागले की वाहतुकीचा खोळंबा होतो. दिवसभर हा खेळ सुरू असतो.तरीही येथे अद्यापही स्कायवॉक किंवा भुयारी मार्ग करण्याचा विचार राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा तयार करताना झालेला नाही. सरकत्या जिन्यांची सुविधा असलेले किमान तीन स्कायवॉक शिर्डीत उभारणे गरजेचे आहे.

राहाता हे तालुक्याचे गाव. गुरुवारी बाजारच्या दिवशी पंधरा ते वीस हजार लोक हा रस्ता बाजार करण्यासाठी ओलांडतात. वाहतुकीचा खोळंबा आणि अपघात देखील होतात. येथेही किमान सरकत्या जिन्यांचे दोन स्कायवॉक उभारणे गरजेचे आहे. बाभळेश्वर, कोल्हार व राहुरी येथेही भुयारी मार्ग किंवा स्कायवॉकचीआवश्यकता आहे.स्कायवॉकचा विचारच नाहीनगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वीस वर्षांपासून रखडले. ठेकेदार आणि रस्ते बांधणीचा खर्च बदलत राहिला. मात्र हा रस्ता बांधताना एकदाही स्कायवॉक उभारणीचा विचार झाला नाही. भाविकांसाठी धर्मशाळा उभारावी, असे मायबाप सरकारला वाटले नाही. याउलट सिन्नर ते सावळीविहीर या राष्ट्रीय महामार्गावर गरज आहे तेथे स्कायवॉक उभारले, साईभक्तांसाठी सुसज्ज धर्मशाळा उभारली आणि दुतर्फा झाडे देखील लावली आहेत

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed