संगमनेर । झुंजार न्यूज

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील राजकिय दृष्ट्या  महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी बु ॥ व आश्वी खुर्द  ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं !  

आश्वी बु ॥ व आश्वी खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २७ सदस्यपदाच्या; तर दोन सरपंचांच्या रिक्तपदांच्या निवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा झाली .

दोन्ही ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल . 

चौकट 

निवडणुकीचे बिगुल वाजताचं विखे – थोरात यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली . आश्वी बु ॥ थोराताच्या तर आश्वी खुर्द विखेच्या ताब्यात होती .मात्र ही निवडणुक विकासाच्या मुद्दावर लढली जाणार असल्याची चर्चा होवू लागली आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed