पुणे । झुंजार न्यूज
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही VIIT College, Pune मध्ये NSS VIIT मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानाला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. रक्तदान शिबिराचा शुभारंभ ओम शांती मिशन ट्रस्टच्या सुलभा दीदी व त्यांच्या सहकार्यांनी केले. दुपारच्या सत्रात विक्रांत सिंग आणि Love Care Share चे संस्थापक पियुष शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये PCMC आणि Aacharya Aanad Rushi अशा दोन रक्तपेढ्यांनी सहभाग नोंदवला होता.
त्यामध्ये Datri यांच्या सहकार्याने steam cell donation कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळजवळ विद्यालयातील 450 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यातून 350 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
सर्व NSS VIIT च्या टीमला व्हीआयआयटी कॉलेज चे डायरेक्टर डॉ. विवेक देशपांडे, स्टुडन्ट डीन डॉ. राधिका पुरंदरे, स्टुडन्ट असोसिएट डीन नितीन साखरे, एन एस एस प्रोग्रॅम ऑफिसर विकास कोळेकर, शारदा देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हे रक्तदान शिबिर च्या सर्व एन एस एस व्ही आय आय टी च्या स्वयंसेवकांच्या मदतीने उत्साहात पार पडले.
