संगमनेर । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील खळी येथे आश्वी खुर्द आरोग्य उपकेंद्र अंतर्गत सर्व रोगनिदान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येवून मोठ्या प्रमाणात महीला व पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला . 

 सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विलास वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच तथा संगमनेर तालुका दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद्र पाटील चकोर ,समुदाय आरोग्य अधिकारी श्री डाॅ अमोल ऊगलमुगले, आरोग्य सेवक श्री सिताराम निकम, आशा सेविका श्रीमती सुनिता नागरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

सदरील कार्यक्रमात अंसंर्गजन्य आजार मध्ये ऊच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, मधुमेह या सारख्या आजाराची तपासणी करण्यात आली.

 

यावेळी राजेंद्र चकोर म्हणाले की , ग्रामिण भागातील लोकांना दैनदिन मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते आपल्या कामाच्या व्यापातून लोकांचे आपल्या आरोग्याकडे दूर्लक्ष होत असल्याने छोट्या – छोट्या आजारातून मोठ्या समस्या निर्माण होतात तेव्हा लोकांनी वेळच्या वेळी आरोग्यासाठी वेळ दया असे आवाहन केले .

 

यावेळी डॉ उगलमुगले म्हणाले की , मणुष्यांच्या जीवनात आरोग्याला फार महत्व असल्याने छोट्या – छोट्या उद् भवणार्‍या गोष्टीकडे लोकांनी दुर्लक्ष करु नये वेळच्या वेळी आपल्या शरीराची तपासणी करुन घ्यावी व आरोग्य तदुरुस्त ठेवावे .  

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *