आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राष्ट्रीय स्थायी विकास संस्था व मेट्रो पोलिस हेल्थ केअर लि यांच्या संयुक्त विद्यमाने आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे एक दिवशीय अर्श ( ARSH ) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .
या प्रशिक्षणात आशा व गट प्रवर्तकांना किशोरवयामध्ये शारिरीक वाढीचे वेळी भावनिक, मानसिक, लैंगिक बदल होत असतात. याबाबत समाजामध्ये, कुटुंबामध्ये, शाळा कॉलेजमधून योग्य माहिती मिळणे दुरापास्त असते. चुकीच्या माहितीमुळे किशोरवयीन मुलांमुलीमध्ये गैरसमज निर्माण होतात. या गोष्टी सांगण्यात आल्या .
किशोरवयीन मुलांमुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन व जागृती करणे , किशोरवयीन मुलांमुलींना प्रजनन व लैगिंक आरोग्याबाबत माहिती देणे , किशोरवयीन मुलींमध्ये प्रजनन व लैगिक रोगाचे प्रमाण कमी करुन भविष्यकालीन सुरक्षित मातृत्वाबाबत जागृती करणे , किशोरवयीन मुलांमुलीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे , किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेविषयी जागृती करणे
किशोरवयीन मुलांमुलींमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरु केली आहे. शाळेत जाणा-या इयत्ता ६ वी ते १२ वी मधील मुलेमुली व शाळेत न जाणा-या किशोरवयीन मुली, विवाहित पण गरोदर नसलेल्या किशोरवयीन मुली हे या योजने अंतर्गत लाभार्थी आहेत. लोहयुक्त गोळयांचे वाटप शाळा व अंगणवाडी केंद्रामार्फत केले जाते व जंतनाशक गोळी वर्षातुन दोनवेळा सहा महिन्याच्या अंतराने दयावे याकरिता अंगणवाडी सेविका , शिक्षक , पालक , आशा सेविकांनी यांचे एकत्रिण प्रशिक्षण घ्यावे अशी माहिती या प्रशिक्षात देण्यात आली .
यावेळी गटप्रवर्तक मंगल जोशी , कल्पना जोशी , मंगल पडघलमल , दिपाली गवारी , ज्योती ठाकरे , अनिता खुळे आदीसह आशा सेविका उपस्थित होत्या .
