मुंबई । झुंजार न्यूज
डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्मदीक्षा समारोह समिती उपरोक्त समितीची बैठक केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली 7 आक्टो. 23 रोजी नंदगीरी गेस्ट हाउस बांद्रा मुंबई येथे संपन्न झाली .

डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्मदीक्षा समारोह समितीच्या अध्यक्षपदी म्हणून केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी डॉ भदंत्ते राहुल बोधी ,
जनरल सेक्रेटरी पदी अविनाश कांबळे , कोषाध्यक्ष पदी पद्मश्री कल्पना ताई सरोज , वरिष्ठ उपाध्यक्ष पदी सुबचंद्र राम , उपाध्यक्षपदी माजी मंत्री अविनाश महातेकर , चंद्र बोधी पाटील , ऍड. बि. के. बर्वे , भारत वानखेडे , सहसचिव ऍड. अजय कुमार भोसले , सदस्य केशव कांबळे , अर्जुन डांगळे , घनश्याम चिरणकर , आदी जेष्ठांची समितीत निवड करण्यात आली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 आक्टो. 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा सोहळा भव्य प्रमाणात साजरा झाल्या नंतर पुढील धम्म दीक्षा सोहळा रेसकोर्स मुंबई येथे दि 16 डिसेंबर 1956 रोजी करण्याचे ठरवले होते परंतु बाबांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे त्याच तारखेला बौद्ध धम्म दीक्षा सोहळा साजरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांनी संकल्प केला होता त्यानुसार काही वर्षे पूर्वी 26 मे 2007 रोजी कार्यक्रम झाला मात्र त्यानंतर 16 डिसेंबर तारीख उपलब्ध नव्हती परंतु आता ना रामदास आठवले साहेबांनी सर्वाशी चर्चा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील संकल्प पूर्ण करण्यासाठी दि. 15 व 16 डिसेंबर 23 रोजी बौद्ध धम्म दीक्षा सोहळा रेसकोर्स मुंबई येथे साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय समितीशी चर्चा करुन घेतला .
