नगर । झुंजार न्यूज
दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाइनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन बेमुदत संपाची हाक दिली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ३२०० आशा सेविका व १९० गटप्रवर्तक तर राज्यातून ७४ हजार आशासेविका संपावर गेल्या आहे. जोपर्यंत ऑनलाईनचे काम काढून घेतले जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्र घेण्यात आला आहे.



आशा वर्कर यांना ऑनलाईनची कामे देऊ नये, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी आदी मागण्याक करण्यात आल्या आहे. मोर्चाचे निवेदन राष्ट्रीय ग्रामीणचे नियंत्रक अमोल शिंदे व जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्ये यांना देण्यात आले
