कोपरगाव | झुंजार न्यूज
अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने रविवार २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हॉटेल शांतीकमल, शिर्डी बसस्थानकाशेजारी, मेन रोड, शिर्डी येथे मराठा वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले असून त्याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष दिपक धट (भोजडे) यांनी सांगितले.
ते म्हणाले की, या मेळाव्याचे उदघाटन राष्ट्रीय अध्यक्ष सदानंद भोसले यांच्या हस्ते तर मराठा क्रांती स्वराज संघटनेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. मराठा समाजाचे संघटन वाढवुन विवाह विषयक समस्या सोडविण्याचा मुख्य उददेश यातुन सफल होणार आहे.
या वधु वर परिचय मेळाव्यात मराठा समाजातील नव वधु वर, विदुर, विधवा, घटस्फोटीत महिला किंवा पुरूष विवाह इच्छुक स्थळांची माहिती विनामूल्य दिली जाणार आहे सदरचा वधू वर मेळावा यशस्वी करण्यासाठी बापूसाहेब सुराळकर जिल्हा उपाध्यक्ष, उत्तमराव धट राहाता तालुकाध्यक्ष भ्रमणध्वनी ९४२३१६ ०९११, सोमनाथ राशिनकर कोपरगांव तालुका सचिव, भ्रमणध्वनी ८४३२५ ८७५७५ यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहे, जिल्ह्यात अशा प्रकारचा मराठा समाजाचा वधू वर परीचय मेळावा पहिल्यांदाच भरवला जात आहे, तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी या मराठा वधु वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा क्रांती स्वराज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
